Man Ka Bolavite
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
जे परतून कधी ना आले
जे परतून कधी ना आले
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
श्रावणधारा वादळवारा
श्रावणधारा वादळवारा
झेलिल्या मी उन्हाच्या झळा
झिरपत झिरपत उन्हाळ्यामागून
झिरपत झिरपत उन्हाळ्यामागून
आला पावसाळा
मन माझे कुणा ना दिसले
मन माझे कुणा ना दिसले
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
पाखरे जर दिवस असते
आभाळी मी सोडिले नसते
पाखरे जर दिवस असते
आभाळी मी सोडिले नसते
धरुनी त्यांना हृदयांत मी
धरुनी त्यांना हृदयांत मी
कोंडुनी ठेविले असते
ते पाखरू मागे न वळले
ते पाखरू मागे न वळले
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं हं