Majhya Dehachi Ghongadi
माझ्या देहाची घोंगडी
तुम्हा म्होर अंथरली
माझ्या देहाची घोंगडी
तुम्हा म्होर अंथरली
बसा इठुराया तुम्ही
मांडी घाला खिनभरी
मांडी घाला खिनभरी
माझ्या देहाची घोंगडी
तुम्हा म्होर अंथरली
उभ राहुनिया देवा तुझ थकल र पाय
तुझ्या भोळ्या भगताला कस उमगत न्हाय
उभ राहुनिया देवा तुझ थकल र पाय
तुझ्या भोळ्या भगताला कस उमगत न्हाय
किती युग रहाशील तू असा उभा इटेवरी
बसा इठुराया तुम्ही
मांडी घाला खिनभरी
मांडी घाला खिनभरी
माझ्या देहाची घोंगडी
तुम्हा म्होर अंथरली
भक्त पुंडलिका वाणी मी भी तुझा एक भक्त
तुला बसल्या मी देतो माझ्या देहाच हे तख्त
भक्त पुंडलिका वाणी मी भी तुझा एक भक्त
तुला बसायया मी देतो माझ्या देहाच हे तख्त
जरा सोड ह्यो गाभारा
एक राजा माझ्या हरी
बसा इठुराया तुम्ही
मांडी घाला खिनभरी
मांडी घाला खिनभरी
माझ्या देहाची घोंगडी
तुम्हा म्होर अंथरली
शुभ्र तांदळावानी हे माझ येड खुळ मन
कस धुतलया बघ येकदाच डोकावून
शुभ्र तांदळावानी हे माझ येड खुळ मन
कस धुतलया बघ येकदाच डोकावून
तुझ्यासाठी देवा
तुझ्यासाठी देवा केली
माझ्या देहाची पंढरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
दिंड्या नाचवत येतील जवा तुझ वारकरी
लै व्हईल बोभाटा आर कुठ गेला हरी
दिंड्या नाचवत येतील जवा तुझ वारकरी
लै व्हईल बोभाटा आर कुठ गेला हरी
गपचिप जार पुन्हा रहा उभा इटेवरी
गपचिप जार पुन्हा रहा उभा इटेवरी
माझ्या देहाची घोंगडी
तुम्हा म्होर अंथरली
बसा इठुराया तुम्ही
मांडी घाला खिनभरी
मांडी घाला खिनभरी
माझ्या देहाची घोंगडी
तुम्हा म्होर अंथरली