Sugriva He Sahas Asale

G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE

अतिशय आर्त स्वरान सीता श्रीरामांच्या प्राणहीन शीरशी
शेवटच संवाद करता करता मूर्चित झाली
सरमा नावा एका राखशसी ने तिला झाला खरा प्रकार सांगितला
तेव्हा तिच्या जीवात जीव आला
श्रीराम अद्याप जिवंत आहेत हे सर्वे कळून कळताच
डोळ्या मध्ये प्राण साठवून ती राम दर्शनाची प्रतीक्षा करू लागली
लंकेच्या बाज्या परिसरा मधील सुवेल पर्वातवर चढून
श्रीराम लक्ष्मण सुग्रीव इत्यादी वीर लंकेचा विस्तार पाहत होते
विभीषण त्यांना सर्व खाणा खुणा समजावून सांगत होता
तोच सुग्रीवाचे लक्ष कुठे तरी केंद्रित झालं
त्याच वेळेला लंकाधीपती रावण आपल्या प्रसादाच्या सौधा वरून
राम सिनेच निरीक्षण करत होता
त्याला पाहताच महापराक्रमी सुग्रीव एकदम सुवेला वरून उडाला
आणि रावणाला जाऊन भिडला
रावण सुग्रीवाच अटी तटीच द्वंद्व झालं
आणि आता जेव्हा रावण आपल्या मायावी शक्ती दाखवू लागला
तेव्हा सुग्रीव त्येच्या कविटून निसटला आणि परत रामांच्या समीप आला
आंगा वरती ठाई ठाई जखमा झाल्या आहेत
सर्वांग रक्तान न्हाऊन निघालेल आहे
अश्या त्या सेनापतीला सुग्रीवाला रामानी प्रथम प्रेमानी आलिंगन दिल
आणि नंतर मात्र सौम्य शब्दा मध्ये त्याची कान उघाडली केली आहे
श्रीराम सुग्रीवाला सांगतायेत
सुग्रीवा हें साहस असलें
सुग्रीवा हें साहस असलें
भूपतीस तुज मुळिं न शोभलें
भूपतीस तुज मुळिं न शोभलें
सुग्रीवा हें साहस असलें

अटीतटीचा अवघड हा क्षण
मायावी तो कपटी रावण
भिडलासी त्या अवचित जाउन
भिडलासी त्या अवचित जाउन
काय घडें तें नाहीं कळलें
भूपतीस तुज मुळिं न शोभलें
सुग्रीवा हें साहस असलें

विचारल्याविण मला विभिषणा
सांगितल्याविण नला लक्ष्मणा
कुणा न देतां पुसट कल्पना
कुणा न देतां पुसट कल्पना
उड्डणा तव धाडस धजलें
उड्डणा तव धाडस धजलें
भूपतीस तुज मुळिं न शोभलें
सुग्रीवा हें साहस असलें

ज्ञात मला तव अपार शक्ति
माझ्यावरची अलोट भक्ति
तरीहि नव्हतें योग्य संप्रति
तरीहि नव्हतें योग्य संप्रति
अनपेक्षित हें काही घडले
भूपतीस तुज मुळिं न शोभलें
सुग्रीवा हें साहस असलें

द्वंद्वे जर तुज वधणें रावण
वृथा जमविलीं सैन्यें आपण
कशास यूथप वा वानरगण
कशास यूथप वा वानरगण
व्यर्थच का हे ऋक्ष मिळविले
भूपतीस तुज मुळिं न शोभलें
सुग्रीवा हें साहस असलें

काय सांगुं तुज शत्रुदमना
काय सांगुं तुज शत्रुदमना
नृप नोळखती रणीं भावना
नंतर विक्रम, प्रथम योजना
नंतर विक्रम, प्रथम योजना
अविचारें जय कुणा लाभले
अविचारें जय कुणा लाभले
भूपतीस तुज मुळिं न शोभलें
सुग्रीवा हें साहस असलें

तू पौलस्त्यासवें झुंजता
क्षीण क्षण जर एकच येता
सन्मित्राते राघव मुकता
सन्मित्राते राघव मुकता
तव सैनिक मग असते खचले
भूपतीस तुज मुळिं न शोभलें
सुग्रीवा हें साहस असलें

काय लाभतें या द्वंद्वानें
फुगता रावण लव विजयानें
लढते राक्षस उन्मादानें
लढते राक्षस उन्मादानें
वानर असते परतच फिरले
वानर असते परतच फिरले
भूपतीस तुज मुळिं न शोभलें
सुग्रीवा हें साहस असलें

दशकंठचि मग विजयी होता
मैथिलीस मग कुठुन मुक्तता
व्यर्थच ठरतीं वचनें शपथा
व्यर्थच ठरतीं वचनें शपथा
कुणी राक्षसां असतें वधिलें
कुणी राक्षसां असतें वधिलें
भूपतीस तुज मुळिं न शोभलें
सुग्रीवा हें साहस असलें

जा सत्वर जा जमवी सेना
करी रणज्ञा सुयोग्य रचना
आप्त सैन्यासह वधूं रावणा
आप्त सैन्यासह वधूं रावणा
व्यर्थ न दवडी शौर्य आपुलें
व्यर्थ न दवडी शौर्य आपुलें
भूपतीस तुज मुळिं न शोभलें
सुग्रीवा हें साहस असलें
सुग्रीवा हें साहस असलें

Curiosidades sobre a música Sugriva He Sahas Asale de सुधीर फडके

De quem é a composição da música “Sugriva He Sahas Asale” de सुधीर फडके?
A música “Sugriva He Sahas Asale” de सुधीर फडके foi composta por G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE.

Músicas mais populares de सुधीर फडके

Outros artistas de