Sood Ghe Tyacha Lankapati

G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE

कोण तू कुठला राजकुमार अस लाडीगोडीन पुन्हा पुन्हा विचारीत
श्रीरामांची नगड करणाऱ्या शुर्पन्खेला श्रीराम विनोदाने म्हणाले
मी विवाहित आहे एक पत्नीव्रतधारी आहे
मला काही तुझा प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही
मात्र माझा हा धाकटा भाऊ लक्ष्मण जो अद्यापि अविवाहित आहे
तो तुला आवडतो का पहा
शुर्पणखेन आपला मोहरा लक्ष्मणा कडे वळवला
लक्ष्मण हसत हसत म्हणाला
माझी भार्या होणं म्हणजे दासाची दासी होणं
मी माझ्या वडील बंधूंच्या चरणांचा दास आहे
तू अस कर श्रीरामांचीच कनिष्ट भार्या हो
कदाचित तुझासाठी ते आपल्या प्रथम पत्नीला त्याग सुद्धा करतील
लक्ष्मणाच्या भाषणातील विनोद न समजल्या मुळे
ती मूर्ख राक्षसी म्हणून खरोखरीच रामांच्या पाशी गेली
आणि त्यांना म्हणाली रामा
तू सर्वस्वी माझाच राहावास म्हणून तुझा समक्ष तुझ्या या स्त्रीला मी खाऊनटाकते
शुर्पणखा जानकीच्या अंगावर जेंव्हा धावली
तेव्हा मात्र महा बालाढय श्रीरामांनी लक्ष्मणाला आज्ञा केली
या राक्षसी ला विरूप करून टाक
वडील बंधूंच्या आज्ञे सरशी लक्ष्मणानि खड्ग उपसल आणि
त्या शुर्पणखेचे नाक आणि कान छेदून टाकले
भयंकर आक्रोश करीत ती राक्षसी सार्या आभानातून किंकाल्या फोडीत पळू लागली
आपले बंधू खरे दुषण ह्यांच्या पाशी जाऊन तिने गारण घातल
ते ऐकून ते राखस श्रारामांशी संग्राम कराण्या साठी धावू आले
पण महान धनुरधर श्रीरामांनी दीड मुहुर्ताता त्या सर्वांच सैन्यासह संहार करून टाकला
एकट्या रामानी खर धुषण त्रिशिर आणि चवदा सहस्त्रराक्षस वाधीलास पाहुन
ती विरूप राक्षासी लंकेला पळाली आपला बंधू लंकाधिपती रावण ह्याच्या समोर उभी राहिली
सर्व आमअपत्यां समक्ष ती रावणाला म्हणू लागली
विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृति
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति

कसलें करिसी राज्य रावणा कसलें जनपालन
श्रीरामानें पूर्ण जिंकिले तुझें दंडका वन
सत्तांधा तुज नाहीं तरीही कर्तव्याची स्मृति
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति

वीस लोचनें उघडुनि बघ या शूर्पणखेची दशा
श्रीरामाच्या पराक्रमानें कंपित दाही दिशा
तुझे गुप्तचर येउन नच का वार्ता सांगति
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति

जनस्थानिं त्या कहर उडाला मेले खरदूषण
सहस्र चौदा राक्षस मेले हें का तुज भूषण
देवासम तो सुपूज्य ठरला जनस्थानिंचा यति
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति

तुझ्याच राज्यीं तुझ्याहुनीही पूज्य जाहला नर
सचिवांसंगे बैस येथ तूं स्वस्थ जोडुनी कर
जाळुन टाकिल तव सिंहासन उद्यां तयाची द्युति
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति

सुदर्शनासह व्यर्थ झेलले छातीवर तूं शर
व्यर्थ मर्दिले देव उचलिले सामर्थ्ये डोंगर
तूंच काय तो धर्मोच्छेदक अजिंक्य सेनापति
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति

तूंच काय रे कुबेर जिंकुन पुष्पक नेलें घरीं
तूंच काय तो हरिली ज्यानें तक्षकनृपसुंदरी
तूंच काय तो भय मृत्यूचें लव नाहीं ज्याप्रति
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति

ऐक सांगतें पुन्हां तुला त्या श्रीरामाची कथा
बाण मारता करांत त्याच्या चमके विद्युल्लता
शस्‍त्रनिपुणता बघून त्याची गुंग होतसे मति
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति

तो रूपानें रेखीव श्यामल भूमीवरती स्मर
त्याच्यासंगे जनककन्यका रतीहुनी सुंदर
तुलाच साजुन दिसेल ऐसी मोहक ती युवति
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति

तिला पळवुनी घेउन यावें तुजसाठीं सत्वर
याचसाठिं मी गेलें होतें त्यांच्या कुटिरावर
श्रवणनासिका तोडुन त्यांनी विटंबिलें मज किती
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति

जा सत्वर जा ठार मार ते बंधू दोघेजण
हसली मज ती जनककन्यका येइ तिज घेउन
माझ्यासम ते तव सत्तेची विटंबिती आकृति
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति
सूड घे त्याचा लंकापति

Curiosidades sobre a música Sood Ghe Tyacha Lankapati de सुधीर फडके

De quem é a composição da música “Sood Ghe Tyacha Lankapati” de सुधीर फडके?
A música “Sood Ghe Tyacha Lankapati” de सुधीर फडके foi composta por G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE.

Músicas mais populares de सुधीर फडके

Outros artistas de