Setu Bandha Re Sagari

G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE

सर्व लंका पेटवल्यावर शांत चित्ता न हनुमंता न आपला पुछह सागरजाला मध्ये भिजू दिल
आणि त्यानंतर आकाश मार्गानं तो परत श्रीरामाच्या पाशी आला सीतेने दिलेला मणी श्री रामाने अचूक ओळखला
आणि अतयंत आनंदानी हनुमंताला गाळ आलिंगन दिलं असंख्य वणारासह राम लक्ष्मण दक्षिणेला निघाले
ते सर्वजण समुद्रतीरावर पोहचले आणि आता प्रश्न असा पडला कि समुद्र उल्लंघवा कसा
तीन दिवस पर्यंत श्री रामाने सागराची प्रार्थना केली परंतू सागर काही प्रकट झाला नाही
तेव्हा संतापून शेवटी रामाणी सागरावरती शस्त्र उपसले रामबाणाच्या भयानी तो सागर साकार प्रकट झाला
आणि नम्रतापूर्वक रामाला म्हणाला कि रामा आपल्या सैन्या मध्ये
नळ नामाचा एक वानर आहे तो प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा पुत्र आहे त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधवा
आणि तो सेतू मी माझ्या छातीवर आनंदाने धारण करेल श्री रामाने नळाला आज्ञा दिली आणि नळाच्या आधीभाटया असंख्य वानर
सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्च दराने गाऊ लागले

सेतू बांधा रे सेतू बांधा रे
सेतू बांधा रे सेतू बांधा रे
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सीतावर रामचंद्रकी जय
सेतू बांधा रे सेतू बांधा रे
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सीतावर रामचंद्रकी जय

गिरिराजांचे देह निखळूनी
गजांगशा त्या शिळा उचलुनी
गिरिराजांचे देह निखळूनी
गजांगशा त्या शिळा उचलुनी
जलांत द्या रे जवें ढकलुनी
जलांत द्या रे जवें ढकलुनी
सेतुबंधने जोडुन ओढा
सेतुबंधने जोडुन ओढा समीप लंकापुरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सीतावर रामचंद्रकी जय

फेका झाडें फेका डोंगर
पृष्ठी झेलिल त्यांना सागर
फेका झाडें फेका डोंगर
पृष्ठी झेलिल त्यांना सागर
ओढा पृथ्वी पैलतटावर
ओढा पृथ्वी पैलतटावर
वडवाग्नी तो धरील माथीं वडवाग्नी तो धरील माथीं
सेतू शेषापरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सीतावर रामचंद्रकी जय

रामभक्ति ये दाटुनि पोटीं
शततीर्थांच्या लवल्या पाठी
रामभक्ति ये दाटुनि पोटीं
शततीर्थांच्या लवल्या पाठी
सत्कार्याच्या पथिकासाठीं
सत्कार्याच्या पथिकासाठीं
श्रीरामाला असेच घेती श्रीरामाला असेच घेती
वानर पाठीवरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सीतावर रामचंद्रकी जय

नळसा नेता सहज लाभतां
कोटी कोटी हात राबतां
नळसा नेता सहज लाभतां
कोटी कोटी हात राबतां
प्रारंभी घे रूप सांगता
प्रारंभी घे रूप सांगता
पाषाणाच हे पहा लीलया पाषाणाच हे पहा लीलया
तरती पाण्यावरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सीतावर रामचंद्रकी जय

चरण प्रभुचे जळांत शिरतां
सकळ नद्यांना येइ तीर्थता
चरण प्रभुचे जळांत शिरतां
सकळ नद्यांना येइ तीर्थता
आरंभास्तव अधीर पूर्तता
आरंभास्तव अधीर पूर्तता
शिळा होउनी जडूं लागल्या शिळा होउनी जडूं लागल्या
लाट लाटांवरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सीतावर रामचंद्रकी जय

गर्जा गर्जा हे वानरगण
रघुपती राघव पतितपावन
रघुपती राघव पतितपावन
रघुपती राघव पतितपावन
गर्जा गर्जा हे वानरगण
रघुपती राघव पतितपावन
जय लंकारी जानकिजीवन
जय लंकारी जानकिजीवन
युद्धाआधी झडूं लागु द्या युद्धाआधी झडूं लागु द्या
स्फूर्तीच्या भेरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सीतावर रामचंद्रकी जय

सेतूनच हा क्रतू श्रमांचा
विशाल हेतु श्रीरामांचा
सेतूनच हा क्रतू श्रमांचा
विशाल हेतु श्रीरामांचा
महिमा त्यांच्या शुभनामाचा
महिमा त्यांच्या शुभनामाचा
थबकुनि बघती संघकार्य हें थबकुनि बघती संघकार्य हें
स्तब्ध दिशा चारी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सीतावर रामचंद्रकी जय

बुभुःकारुनी पिटवा डंका हो हो हो हो
विजयी राघव हरली लंका हो हो हो हो
बुभुःकारुनी पिटवा डंका
विजयी राघव हरली लंका
मुक्‍त मैथिली कशास शंका
मुक्‍त मैथिली कशास शंका
सेतुरूप हा झोतच शिरला सेतुरूप हा झोतच शिरला
दुबळ्या अंधारी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सीतावर रामचंद्रकी जय
सेतू बांधा रे सेतू बांधा रे
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सीतावर रामचंद्रकी जय
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सीतावर रामचंद्रकी जय
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सेतू बांधा रे सागरी
सीतावर रामचंद्रकी जय

Curiosidades sobre a música Setu Bandha Re Sagari de सुधीर फडके

De quem é a composição da música “Setu Bandha Re Sagari” de सुधीर फडके?
A música “Setu Bandha Re Sagari” de सुधीर फडके foi composta por G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE.

Músicas mais populares de सुधीर फडके

Outros artistas de