Sari Bhagwantachi Karni

Yeshwant Deo, P Savalaram

भगवंताची करणी

सारी भगवंताची करणी
सारी भगवंताची करणी
अधांतरी हे झुले नभांगण
अधांतरी हे झुले नभांगण शेषफणावर धरणी
सारी भगवंताची करणी

लक्ष्मीसाठी घर गर्वाचे उंच बांधूनी देतो
गरीबासाठी गरीब होऊन झोपडीतही रमतो
झोपडीतही रमतो
पतितासंगे
पतितासंगे पतितपावन चालतसे अनवाणी
सारी भगवंताची करणी
सारी भगवंताची करणी

समुद्रात जरी अथांग पाणी तहान शमवी श्रावणधार
अन्न ब्रम्ह ते अखंड घेते
अन्न ब्रम्ह ते अखंड घेते काळ्या मातीतून अवतार
जगण्यासाठी
जगण्यासाठी तरी मानवा लाग प्रभूच्या चरणी
सारी भगवंताची करणी
सारी भगवंताची करणी

जिथे वाजतो घुंगूरवाळा बालक होऊन तिथे रांगतो
बालक होऊन तिथे रांगतो
मायबाप तो सर्व जगाचा आईसाठी जगात येतो
हात जोडूनी देव बोलतो शरण तुला गे जननी
सारी भगवंताची करणी
सारी भगवंताची करणी
अधांतरी हे झुले नभांगण
अधांतरी हे झुले नभांगण शेषफणावर धरणी
सारी भगवंताची करणी
सारी भगवंताची करणी

Curiosidades sobre a música Sari Bhagwantachi Karni de सुधीर फडके

De quem é a composição da música “Sari Bhagwantachi Karni” de सुधीर फडके?
A música “Sari Bhagwantachi Karni” de सुधीर फडके foi composta por Yeshwant Deo, P Savalaram.

Músicas mais populares de सुधीर फडके

Outros artistas de