Mata Na Tu Vairini

Sudhir Phadke, G D Madgulkar

दशरथाचा प्राणहरणांनी वरिष्ठाधिकाणी अत्यंत
संयमानी नंदिग्रामहून भरताला आणण्यासाठी
दूत पाठवले मात्र दशरथाच्या मृत्यूचे वर्तमान
बुध्यास त्यांनी त्यापासून गुप्त ठेवलं कदाचित
रामाला युवराज्याभिषेक होणार असेल या कल्पनेनं
अतिशय आनंदित होऊन भरत अत्यंत त्वरित
अयोध्येमध्ये आला त्याने अयोध्ये मध्ये प्रवेश केला
आणि जी अयोध्या त्याने पहिली ती बहुल त्याला
विलक्षण झटका बसला अशी अयोध्या त्याने
कधी कल्पनेत हि आणली नव्हती स्वप्नात हि
आणली नव्हती त्याने पाहिलं कि त्या चैतन्य
नगरीचा सर्व चैतन्यच नाहीस झालंय जिवंतपणाचा
लक्षणच त्या ठिकाणी उरलेलं नाहीये त्याला काही कळेना
कि हे का कश्यासाठी याच कारण काय तो आपल्या
प्रसादामध्ये गेला आणि तिथे त्याची आई त्याला भेटली
कैकयी भरताला पाहताच क्षणी हर्षाने भारताला म्हणाली
भरता तुझी मी सारखी चाबकासारखी वाट पाहिली आहे
तुझा पिता निधन पावला आहे राम इथून दूर वनात गेलाय
टळलाय आणि सिंहासन तुझ्यासाठी मोकळं आहे
तू लवकरात लवकर तुझ्या पित्याचे अवधूतही पुरे कर
स्वतःलाही तू राज्याभिषेक करून घे तू राजा झाला आहेस
माझा भरत सिहासनावर बसला आहे हे दृश्य
मी केव्हा एकदा पाहीन असं मला झालंय
हे मी तुझ्यासाठी घडून आणलाय स्वतः घडून आणलाय
आपल्या आईच हे अत्यंत छपवी आणि स्वार्थी
असं बोलणं भरताला ऐकवलं नाही त्याचा संताप
अनावर झाला आणि अनावर संतापाने भडकलेला
भरत आपल्या आईला म्हणतोय माता न तूं वैरिणी

माता न तूं वैरिणी माता न तूं वैरिणी
माता न तूं वैरिणी माता न तूं वैरिणी

अश्वपतीची नव्हेस कन्या नव्हेस माझी माय
धर्मात्म्यांच्या वंशी कृत्या निपजे नांदे काय
वध नाथाचा करील मूढे पतिव्रता का कुणी
माता न तूं वैरिणी माता न तूं वैरिणी
माता न तूं वैरिणी

शाखेसह तूं वृक्ष तोडिला फळां इच्छिसी वाढ
आत्मघातकी ज्ञानाचे या गातील भाट पवाड
शाखेसह तूं वृक्ष तोडिला फळां इच्छिसी वाढ
आत्मघातकी ज्ञानाचे या गातील भाट पवाड
स्वीकारिन मी राज्य तुझ्यास्तव
स्वीकारिन मी राज्य तुझ्यास्तव
कीर्ती होईल दुणी माता न तूं वैरिणी
माता न तूं वैरिणी माता न तूं वैरिणी

वनांत भ्रात्या धाडिलेंस तूं स्वर्गि धाडिले तात
श्रीरामांते वल्कल देतां कां नच जळले हात
वनांत भ्रात्या धाडिलेंस तूं स्वर्गि धाडिले तात
श्रीरामांते वल्कल देतां कां नच जळले हात
उभी न राही पळभर येथें
उभी न राही पळभर येथें
काळें कर जा वनीं माता न तूं वैरिणी
माता न तूं वैरिणी माता न तूं वैरिणी

निराधार हा भरत पोरका कुठें आसरा आज
निपुत्रिके तूं मिरव लेवुनी वैधव्याचा साज
निराधार हा भरत पोरका कुठें आसरा आज
निपुत्रिके तूं मिरव लेवुनी वैधव्याचा साज
पडो न छाया तुझी पापिणी
पडो न छाया तुझी पापिणी
सदनीं सिहासनीं माता न तूं वैरिणी
माता न तूं वैरिणी माता न तूं वैरिणी

तुला पाहतां तृषार्त होते या खड्गाची धार
श्रीरामांची माय परि तूं कसा करूं मी वार
तुला पाहतां तृषार्त होते या खड्गाची धार
श्रीरामांची माय परि तूं कसा करूं मी वार
कुपुत्र म्हणतिल मला कैकयी
कुपुत्र म्हणतिल मला कैकयी
माता दोघीजणी माता न तूं वैरिणी
माता न तूं वैरिणी माता न तूं वैरिणी

कसा शांतवूं शब्दानें मी कौसल्येचा शोक
सुमित्रेस त्या उदासवाणे गमतिल तिन्ही लोक
कसा शांतवूं शब्दानें मी कौसल्येचा शोक
सुमित्रेस त्या उदासवाणे गमतिल तिन्ही लोक
कुठल्या वचनें नगरजनांची करुं मी समजावणी
माता न तूं वैरिणी माता न तूं वैरिणी
माता न तूं वैरिणी

वनाहुनीही उजाड झालें रामाविण हें धाम
वनांत हिंडुन धुंडुन आणिन परत प्रभु श्रीराम
वनाहुनीही उजाड झालें रामाविण हें धाम
वनांत हिंडुन धुंडुन आणिन परत प्रभु श्रीराम
नका आडवे येउं कुणी
नका आडवे येउं कुणी
माझिया पणीं माता न तूं वैरिणी
माता न तूं वैरिणी माता न तूं वैरिणी

चला सुमंता द्या सेनेला एक आपुल्या हांक
श्रीरामाला शोधण्यास्तव निघोत नजरा लाख
चला सुमंता द्या सेनेला एक आपुल्या हांक
श्रीरामाला शोधण्यास्तव निघोत नजरा लाख
अभिषेकास्तव घ्या सांगातीं वेदजाणते मुनी
माता न तूं वैरिणी माता न तूं वैरिणी
माता न तूं वैरिणी

असेल तेथें श्रीरामाचा मुकुट अर्पिणें त्यास
हाच एकला ध्यास येथुनी हीच एकली आस
असेल तेथें श्रीरामाचा मुकुट अर्पिणें त्यास
हाच एकला ध्यास, येथुनी हीच एकली आस
काळरात्रसी रहा इथें तूं
काळरात्रसी रहा इथें तूं
आक्रंदत विजनीं माता न तूं वैरिणी
माता न तूं वैरिणी माता न तूं वैरिणी

Curiosidades sobre a música Mata Na Tu Vairini de सुधीर फडके

De quem é a composição da música “Mata Na Tu Vairini” de सुधीर फडके?
A música “Mata Na Tu Vairini” de सुधीर फडके foi composta por Sudhir Phadke, G D Madgulkar.

Músicas mais populares de सुधीर फडके

Outros artistas de