Leenate Charute Seete

G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE

श्रीरामानि रावणाचा और्द देहिक करण्याचा विभीषणाला अज्ञा केली
राम म्हणाले वैर्य मरणा पर्येंतच कायम राहत
आपला कार्य भाग ही आता उरक्लाय
ह्याचा तु संस्कार कर तो जसा तुझा आहे
तसा माझा ही पण आहे
रावणाच्या मृत्युन त्याच्या अन्तः पुरात शोकाला पूर लोटला
रावण वधा नंतर श्रीरामानि आपलं रणकर्कश रूप पार टाकून दिल
सौम्य रूप धारण केल
हनुमंताला आज्ञा केलि
हे वानराधीपते विजयवार्ता आणि आमचं कुशल
तू जानकीला जाऊन निवेदन कर
हनुमंतानी सांगितलेली वार्ता ऐकताच
आनंदाची सीता अबोल झाली
इतकच म्हणालि भक्तवत्सल भर्त्याची दर्शन मला अत्यंत इच्छा आहे
तिची अवस्था हनुमंतांनी श्रीरामांना निवेदन केली
त्यांचे ही डोळे पाणावले
त्यांनी विभिषणाला आज्ञा केलि
सीतेला त्वरित माझा पाशी घेऊन ये
सीता रामा समोर आली
पती पत्नींना एकमेकांच मुखदर्शन झाल
आणि राजाधीराज रामचंद्र सौम्य स्वरा मध्ये
त्या जनकनंदिनीला म्हणू लागले
किती यत्‍नें मी पुन्हां पाहिली तूंते
किती यत्‍नें मी पुन्हां पाहिली तूंते
लीनते चारुते सीते
लीनते चारुते सीते
संपलें भयानक युद्ध
दंडिला पुरा अपराध
संपलें भयानक युद्ध
दंडिला पुरा अपराध
मावळला आतां क्रोध
मावळला आतां क्रोध
मी केलें जें
उचित नृपातें होतें
लीनते चारुते सीते
लीनते चारुते सीते

घेतले रणीं मी प्राण
नाशिला रिपू अवमान
घेतले रणीं मी प्राण
नाशिला रिपू अवमान
उंचावे फिरुनी मान
उंचावे फिरुनी मान
तव भाग्यानें वानर ठरले जेते
लीनते चारुते सीते
लीनते चारुते सीते

शब्दांची झाली पूर्ती
निष्कलंक झाली कीर्ति
शब्दांची झाली पूर्ती
निष्कलंक झाली कीर्ति
पाहिली प्रियेची मूर्ति
पाहिली प्रियेची मूर्ति
मी शौर्यानें वांकविलें दैवातें
लीनते चारुते सीते
लीनते चारुते सीते

तुजसाठीं सागर तरला
तो कृतार्थ वानर झाला
तुजसाठीं सागर तरला
तो कृतार्थ वानर झाला
सुग्रीव यशःश्री ल्याला
सुग्रीव यशःश्री ल्याला
सुरललनाही गाती मंगल गीतें
लीनते चारुते सीते
लीनते चारुते सीते

हें तुझ्यामुळें गे झालें
तुजसाठी नाहीं केलें
हें तुझ्यामुळें गे झालें
तुजसाठी नाहीं केलें
मी कलंक माझे धुतले
मी कलंक माझे धुतले
गतलौकिक गे लाभे रघुवंशातें
लीनते चारुते सीते
लीनते चारुते सीते

जो रुग्णाइत नेत्रांचा
जो रुग्णाइत नेत्रांचा
दीपोत्सव त्यातें कैचा
जो रुग्णाइत नेत्रांचा
दीपोत्सव त्यातें कैचा
मनि संशय अपघाताचा
मनि संशय अपघाताचा
मी विश्वासूं केवि तुझ्यावर कांते
मी विश्वासूं केवि तुझ्यावर कांते
लीनते चारुते सीते
लीनते चारुते सीते

तो रावण कामी कपटी
तो रावण कामी कपटी
तूं वसलिस त्याच्या निकटीं
तो रावण कामी कपटी
तूं वसलिस त्याच्या निकटीं
नयनांसह पापी भृकुटी
नयनांसह पापी भृकुटी
मज वदवेना स्पष्ट याहुनी भलतें
लीनते चारुते सीते
लीनते चारुते सीते

मी केलें निजकार्यासी
मी केलें निजकार्यासी
दशदिशा मोकळ्या तुजसी
नच माग अनुज्ञा मजसी
नच माग अनुज्ञा मजसी
सखि सरलें तें दोघांमधलें नातें
सखि सरलें तें दोघांमधलें नातें
लीनते चारुते सीते
लीनते चारुते सीते

Curiosidades sobre a música Leenate Charute Seete de सुधीर फडके

De quem é a composição da música “Leenate Charute Seete” de सुधीर फडके?
A música “Leenate Charute Seete” de सुधीर फडके foi composta por G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE.

Músicas mais populares de सुधीर फडके

Outros artistas de