Bhuvari Ravanvadh Zala

G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE

श्रीरामांच्या सारख्या समर्थ वीराच्या तोंडचे हे उदगार ऐकून
इंद्र सारथी मात्री किंचीत हसला आणि म्हणाला
प्रभू असं न समजण्या सारखा काय बोलत आहत
त्याच्या वधा करता पिता महाअस्त्रचा उपयोग करा
देवाने जो रावणाचा मृत्यू चा काळ सांगून ठेवला आहे
तो आता अगदी समीप आला आहे
मातलीच्या या भाषणानं आता श्रीरामांना जणू स्मरण आलं
आणि अगस्थी ऋषी ने दिलेला दैदिप्यमान बाण धनुष्याला लावला
आकारण प्रत्यंचा उडून त्याने तो बाण महा प्रतापी रावणच्या दिशे ने सोडला
तो दुःसह आणि प्रत्यक्ष मरणा प्रमाणे अनिवार्य असलेला बाण
रावणाच्या वक्षस्थळ जाऊन घुसला
त्याने रावणाचा हृदय शतशः विदीर्ण करून टाकला
बाणांचा प्रहार होताच जीविताला मुकणाऱ्या त्या रावणाच्या हातून
धनुष्य बाण हि खाली पडले
तो महातेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला
राक्षस सैन्य वाटफ़ुटेल तिकडे धावत सुटल
वानरांनी त्यांचा विध्वंस मांडला
सारे वानरगण रावण मेला रामांचा जय झाला
अस म्हणत आनंदाने नाचू लागले
अंतरिक्षातुन देवांच्या सौमि नौबती वाजू लागल्या
रामांच्या रथावर स्वर्गा मधून पुष्पवृष्टी होऊ लागली
अप्सरा आणि गंधर्व यांचे विजयी गीत कानी येऊ लागलं

देवहो बघा रामलीला
देवहो बघा रामलीला
भूवरी रावणवध झाला
भूवरी रावणवध झाला

दाहि दिशांचीं मुखें उजळलीं
कंपरहित ती अवनी झाली
दाहि दिशांचीं मुखें उजळलीं
कंपरहित ती अवनी झाली
रविप्रभेतें स्थिरता आली
रविप्रभेतें स्थिरता आली
पातली महद्भाग्यवेला
पातली महद्भाग्यवेला
भूवरी रावणवध झाला
भूवरी रावणवध झाला

साधु साधु वच वदती मुनिवर
छेडुं लागले वाद्यें किन्‍नर
साधु साधु वच वदती मुनिवर
छेडुं लागले वाद्यें किन्‍नर
प्रमोद उसळे भूलोकावर
प्रमोद उसळे भूलोकावर हो
सुरांचा महारिपू मेला
सुरांचा महारिपू मेला
भूवरी रावणवध झाला
भूवरी रावणवध झाला

रणीं जयांचे चाले नर्तन
नृपासहित हे विजयी कपिगण
रणीं जयांचे चाले नर्तन
नृपासहित हे विजयी कपिगण
श्रीरामांचे करिती पूजन
श्रीरामांचे करिती पूजन हो
वाहुनी फुलें पर्णमाला
वाहुनी फुलें पर्णमाला
भूवरी रावणवध झाला
भूवरी रावणवध झाला

जय जय बोला उच्चरवाने
कल्पतरूंचीं फेका सुमनें
जय जय बोला उच्चरवाने
कल्पतरूंचीं फेका सुमनें
फेका रत्‍नें मणीभूषणें
फेका रत्‍नें मणीभूषणें
जयश्री लाभे सत्याला
जयश्री लाभे सत्याला
भूवरी रावणवध झाला
भूवरी रावणवध झाला

श्याम राम हा धर्मपरायण
हा चक्रायुध श्रीनारायण
श्याम राम हा धर्मपरायण
हा चक्रायुध श्रीनारायण
जगदोत्पादक त्रिभुवनजीवन
जगदोत्पादक त्रिभुवनजीवन हो
मानवी रामरूप ल्याला
मानवी रामरूप ल्याला
भूवरी रावणवध झाला
भूवरी रावणवध झाला

हा उत्पत्ति स्थिति-लयकारक
पद्मनाभ हा त्रिभुवनतारक
हा उत्पत्ति स्थिति-लयकारक
पद्मनाभ हा त्रिभुवनतारक
शरण्य एकच खलसंहारक
शरण्य एकच खलसंहारक हो
आसरा हाच ब्रह्मगोलां
आसरा हाच ब्रह्मगोलां
भूवरी रावणवध झाला
भूवरी रावणवध झाला

वत्सलांछना धरुनी वक्षीं
संतसज्जनां हा नित रक्षी
वत्सलांछना धरुनी वक्षीं
संतसज्जनां हा नित रक्षी
हा सत्याच्या सदैव पक्षीं
हा सत्याच्या सदैव पक्षीं
जाणतो हाच एक याला
जाणतो हाच एक याला
भूवरी रावणवध झाला
भूवरी रावणवध झाला

हा श्री विष्णू कमला सीता
स्वयें जाणता असुन नेणता
हा श्री विष्णू कमला सीता
स्वयें जाणता असुन नेणता
युद्ध करी हें जगताकरितां
युद्ध करी हें जगताकरितां
दाखवी अतुल रामलीला
दाखवी अतुल रामलीला
भूवरी रावणवध झाला
भूवरी रावणवध झाला
देवहो बघा रामलीला
देवहो बघा रामलीला
भूवरी रावणवध झाला
भूवरी रावणवध झाला

Curiosidades sobre a música Bhuvari Ravanvadh Zala de सुधीर फडके

De quem é a composição da música “Bhuvari Ravanvadh Zala” de सुधीर फडके?
A música “Bhuvari Ravanvadh Zala” de सुधीर फडके foi composta por G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE.

Músicas mais populares de सुधीर फडके

Outros artistas de