Are Deva Tujhi Mule

Yashwant Dev

अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
कुणी एकत्र नांदती कुणी एकत्र नांदती
कुणी दूर दहा हात
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
कुणी एकत्र नांदती कुणी एकत्र नांदती
कुणी दूर दहा हात
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात

जात पात पाहुनिया सारा व्यापार ठरतो
जात पात पाहुनिया सारा व्यापार ठरतो
मोठेपणा माणसाला का रे जन्मासवे येतो
मोठेपणा माणसाला का रे जन्मासवे येतो
कुणी लोळे वैभवात कुणी लोळे वैभवात
कुणी लोळे वैभवात कुणी पोळतो चिंतेत
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात

नाथाघरचे भोजन सारा गाव पंगतीला
नाथाघरचे भोजन आ आ आ आ आ
नाथाघरचे भोजन सारा गाव पंगतीला
दूध भात सर्वामुखी आग्रहाने भरविला
दूध भात सर्वामुखी आग्रहाने भरविला
थोर संतांच्या या कथा थोर संतांच्या या कथा
आम्हा साऱ्यांच्या मुखात
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
कुणी एकत्र नांदती कुणी एकत्र नांदती
कुणी दूर दहा हात
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात

जरी पंढरीचाराव विठू महार जाहला
जरी पंढरीचाराव विठू महार जाहला
गावा बाहेर टाकले आम्ही आमुच्या भावाला
गावा बाहेर टाकले आम्ही आमुच्या भावाला
भूत दयेचे अभंग भूत दयेचे अभंग रंगवितो देऊळात
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात

आता वागण्याची तरा जरा निराळी करावी
आता वागण्याची तरा आ आ आ आ आ आ आ आ
आता वागण्याची तरा जरा निराळी करावी
अभंगाची एक तरी ओवी अनुभवायावी अभंगाची एक तरी ओवी अनुभवायावी
वर्ण भेद ज्याच्या मनी वर्ण भेद ज्याच्या मनी
वर्ण भेद ज्याच्या मनी तोचि मनिणपतीत
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
कुणी एकत्र नांदती कुणी एकत्र नांदती
कुणी दूर दहा हात
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात
अशी का रे भांडतात अशी का रे भांडतात

Curiosidades sobre a música Are Deva Tujhi Mule de सुधीर फडके

De quem é a composição da música “Are Deva Tujhi Mule” de सुधीर फडके?
A música “Are Deva Tujhi Mule” de सुधीर फडके foi composta por Yashwant Dev.

Músicas mais populares de सुधीर फडके

Outros artistas de