Aanand Sangu Kiti

Sudhir Phadke

श्री राम कैलास शिखराप्रमाणे उतुंग आणि
हिमढवळ असलेल्या प्रसादामध्ये गृहस्था
आश्रमांची सौख्य लाभू लागले अत्यंत
सुस्वरूप द्य्नानी पराक्रमी एकवचनी
आणि तरीही शालीन असलेले श्री राम
साऱ्यांनाच अत्यंत प्रिय होऊन राहिले
श्री रामाची एकत्र वागणूक पाहून
वृद्ध दशरथाला आनंदाचे भरते येत होतं
एकदा सहज त्यांच्या मनामध्ये आलं
हे राज्य आता आपण श्री रामाच्या स्वाधीन करावं
आणि आपण विश्रांती सुखाचा लाभ घ्यावा
त्यांनी आपला हा विचार गुरुजन मंत्री
आणि कैकयी जाणकाधिक स्वकीय
यांच्या कानी घातला त्या सर्वानीच त्या विचारला
होकार दिला प्रजाजन तर आनंदाने वेडेच झाले
धाशरथाने प्रसिद्ध करून टाकला चैत्रमासी पुष्य
नक्षत्रावरती श्री रामचंद्र सिंहासनस्त होणार
अश्यावेळी उर्मिलातीत भगिनी सीतेच्या मंदिरात
जाऊन आनंद मिश्रित विनोदाने तिला म्हणूं लागल्या

आनंद सांगूं सखे ग किती मी
आनंद सांगू किती सखे ग
आनंद सांगू किती
सीतावल्लभ उद्यां व्हायचे
राम आयोध्यापति सखे ग
आनंद सांगू किती

सिंहासनिं श्रीराघव बसतां
वामांगी तूं बसशील सीता
सिंहासनिं श्रीराघव बसतां
वामांगी तूं बसशील सीता
जरा गर्विता जरा लज्जिता
जरा गर्विता जरा लज्जिता
राजभूषणां भूषवील ही कमनिय तव आकृति
सखे ग आनंद सांगू किती

गुरुजन मुनिजन समीप येतिल
सप्त नद्यांची जलें शिंपतिल
गुरुजन मुनिजन समीप येतिल
सप्त नद्यांची जलें शिंपतिल
उभय कुळें मग कृतार्थ होतिल
उभय कुळें मग कृतार्थ होतिल
मेघाहुनिही उच्चरवांनी झडतिल गे नोबति
सखे ग आनंद सांगू किती

भर्त्यासम तुज जनीं मान्यता
राज्ञीपद गे तुला लाभतां
भर्त्यासम तुज जनीं मान्यता
राज्ञीपद गे तुला लाभतां
पुत्राविण तूं होशील माता
पुत्राविण तूं होशील माता
अखिल प्रजेच्या मातृपदाची तुज करणे स्वीकृति
सखे ग आनंद सांगू किती
सखे ग आनंद सांगू किती

तुझ्याच अंकित होइल धरणी
कन्या होइल मातृस्वामिनी
तुझ्याच अंकित होइल धरणी
कन्या होइल मातृस्वामिनी
भाग्य भोगिलें असलें कोणीं
भाग्य भोगिलें असलें कोणीं
फळाफुलांनी बहरुनि राहिल सदा माउली क्षिति
सखे ग आनंद सांगू किती

पतितपावन रामासंगें पतितपावना तूंही सुभगे
पतितपावन रामासंगें पतितपावना तूंही सुभगे
पृथ्वीवर या स्वर्गसोख्य घे
पृथ्वीवर या स्वर्गसोख्य घे
तिन्हीलोकी भरुन राहुं दे तुझ्या यशाची दुयुति
सखे ग आनंद सांगू किती

महाराणि तूं आम्ही दासी
लीन सारख्य़ा तव चरणांसी
महाराणि तूं आम्ही दासी
लीन सारख्य़ा तव चरणांसी
कधी कोणती आज्ञा देसी
कधी कोणती आज्ञा देसी
तुझिया चरणीं लीन राहुं दे
तुझिया चरणीं लीन राहुं दे सदा आमुची मति
सखे ग आनंद सांगू किती

विनोद नच हा हीच अपेक्षा
तव भाग्याला नुरोत कक्षा
विनोद नच हा हीच अपेक्षा
तव भाग्याला नुरोत कक्षा
देवदेवता करोत रक्षा देवदेवता करोत रक्षा
दृष्ट न लागो आमुचीच गे तुझिया भाग्याप्रति
सखे ग आनंद सांगू किती

ओळखिचे बघ आले पदरव
सांवलींत गे दिसलें सोष्ठव
ओळखिचे बघ आले पदरव
सांवलींत गे दिसलें सोष्ठव
तुला भेटण्या येती राघव
तुला भेटण्या येती राघव
बालिश नयनीं तुझ्या येइ
कां लज्जेला जागृति
सखे ग आनंद सांगू किती
सखे ग आनंद सांगू किती
सीतावल्लभ उद्यां व्हायचे राम आयोध्यापति
सखे ग आनंद सांगू किती
सखे ग आनंद सांगू किती

Curiosidades sobre a música Aanand Sangu Kiti de सुधीर फडके

De quem é a composição da música “Aanand Sangu Kiti” de सुधीर फडके?
A música “Aanand Sangu Kiti” de सुधीर फडके foi composta por Sudhir Phadke.

Músicas mais populares de सुधीर फडके

Outros artistas de